Friday, November 20, 2009

एवढ कसब शिकवा जरा ! उमेदवारांना विनंती !

आमचा महाराष्ट्र कर्जबाजारी अन आमचे येउ घातलेले सर्व उमेदवार मात्र करोडपति ! सर्व पक्ष आणि स्वत:च्या वतीने हे जीव तोडुन सांगत आहेत की, " आम्ही सत्तेवर येताच पाणी देवू, वीज देवू, रोजगार देवू , कर्ज माफ करू, कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करु, तुम्हाला लखपति बनवू, वगैरे वगैरे हे जे जे देवु करत आहेत, ते ते कांही देवू नका , फक्त तेवढा एकच मंत्र आणि तंत्र सांगा की ५-१० वर्षातच तुम्ही आणि तुमचे आई-बाप, बहीन-भाऊ हे पण करोडोंची कमाई कशी काय करू शकले ? हे एवढे आमच्या तरूण वर्गाला शिकवले तर तुम्ही आम्हाला कांहीच द्यायची गरज पण नाही, आणि हजार प्रकारची आश्वासने पण द्दायची गरज पडणार नाही ! , नाही काय ?
मग एवढ काम कराल ना उमेदवार बंधुनो ? बरं हे काम तुमच्यासाठी कठीन नाही ! कारण तुम्हाला याचा चांगला अनुभव आहे , याबाबचे स्कील पण तुमच्याकडे आहे, तुम्हाला वेळ कमी पडला तर , तुम्हाला तुमचे कार्यकर्ते मदतीला घेता येतील , ते पण आनंदाने मदत करतील, त्यांना पण लोकसेवा करण्याची संधी मिळेल ! ज्यांचे याबाबतचे कसब जरा कमी आहे , अशांना प्रशिक्षण पण मिळेल.
जे उमेदवार निवदणुकीत विजयी होवून आमचे लोकप्रतिनिधी बनतील त्यांना याकामी सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांची मदत तर हक्काने घेता येईल.म्हणुन उमेदवार बंधुनो एवढ काम करा गडे !
यासोबतच आनखी एक काम तुम्हाला करता येईल ! आपल्या महाराष्ट्र राज्याला पण कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढता येईल ! तुमच्याकडे उप्लब्ध असलेले कसब आणि तुमची याबाबतची क्षमता पाहता , तुम्हाला हे करणे पण सहज शक्य आहे. पुढील पाच वर्षाच्या कालावधित तुम्ही एवढे जरी केले तरी महाराष्ट्रातील तमाम जनता तुमचे लाख लाख आभार व्यक्त करतील.
-मच्छींद्र गोजमे

No comments:

Post a Comment